योग व अध्यापन

योग हा माझ्या जीवनप्रवासातील एक महत्त्वाचा भाग आहे.

योगक्षेत्रातील कार्य

१२ हून अधिक वर्षांचे योग प्रशिक्षण

गेल्या १२ हून अधिक वर्षांपासून योग प्रशिक्षक म्हणून कार्य करत असून लोणावळा-खंडाळा, पुणे-मुंबई, कोकण, नाशिक तसेच ऑनलाइन माध्यमातून विविध वयोगटांतील साधकांना योगाचे प्रशिक्षण दिले आहे.

विविध शारीरिक अडचणी व जीवनशैलीशी संबंधित समस्यांमध्ये योगाच्या माध्यमातून अनेक साधकांना मार्गदर्शन केले आहे.

योग प्रशिक्षणाचे शिक्षण: Certificate Course in Yoga (C.C.Y.), कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट, लोणावळा — २०१२.

प्रशिक्षणाची ठिकाणे

  • लोणावळा-खंडाळा
  • पुणे-मुंबई
  • कोकण
  • नाशिक
  • ऑनलाइन

लेखन

‘प्रेरणांकुर’ या महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत प्रसारित होणाऱ्या मासिकासाठी जवळपास तीन वर्षे ‘योगासने’ या विषयावर लेखन केले. योग आणि भारतीय जीवनपद्धती यांतील परस्परसंबंध सामान्य वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या लेखनातून केला.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शाळा-महाविद्यालयांतील मार्गदर्शन

D. P. Mehta Junior College of Arts, Commerce & Science

इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना योग विषयावर व्याख्याने.

Adv. Bapusaheb Bhonde High School, लोणावळा

शैक्षणिक वर्ष २०२२–२३ मध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणक विषयाचे अध्यापन तसेच योग व PT शिक्षिका म्हणून कार्य.

इतर शैक्षणिक कार्य

तालुका व जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये लेखन, नेपथ्य व दिग्दर्शन यामध्ये सहभाग.

विद्यार्थ्यांना योग, संगणक, व्यक्तिमत्त्वविकास, गायन व सादरीकरण यांविषयी मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे.

वेदश्री तपोवन

वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या वेदश्री तपोवनातील वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक, गायन तसेच सार्वजनिक सादरीकरणाच्या वेळी आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन करण्याची संधी लाभली.

याशिवाय संस्कारवर्गांच्या परीक्षा परीक्षिका म्हणून तसेच विविध संस्कारविषयक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणूनही कार्य केले आहे.

संस्कारवर्गांविषयी अधिक माहिती संस्कार व कला या पानावर वाचा. योगाविषयी लेख: योग आणि भारतीय जीवनपद्धती.

योग प्रशिक्षण / अध्यापनासाठी चौकशी

फोन: +91 87963 27305 / +91 83087 99616

* तारांकित माहिती आवश्यक. आपली माहिती फक्त संपर्क साधण्यासाठी वापरली जाईल.