संस्कार, कला व अभिव्यक्ती
बालमनावर संस्कार घडवणे आणि भारतीय संस्कृतीशी नव्या पिढीचा स्नेह दृढ करणे — माझ्या कार्यातील विशेष जिव्हाळ्याची बाजू.
संस्कार आणि सांस्कृतिक कार्य
संस्कारवर्ग
गेल्या अनेक वर्षांपासून वय वर्षे ३ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी संस्कारवर्ग घेण्याचा अनुभव आहे.
संस्कारवर्ग, श्लोक-स्तोत्र पाठांतर, भारतीय संस्कृती आणि मूल्याधिष्ठित उपक्रम यांच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
संबंधित लेख: संस्कारवर्ग: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
अभिव्यक्तीचे विविध आयाम
कीर्तन आणि अध्यापनाबरोबरच कला व अभिव्यक्तीच्या विविध माध्यमांशी माझा दीर्घकाळ संबंध राहिला आहे.
- गायन — शालेय, आंतरशालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन स्तरावरील विविध गायन स्पर्धांमध्ये सहभाग.
- वक्तृत्व — शालेय ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग.
- श्लोक व स्तोत्र पठण — शालेय, आंतरशालेय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग.
- काव्य व लेखन — स्वरचित कविता, लेखन आणि काव्यसादरीकरणामध्ये सहभाग.
- चित्रकला व रांगोळी — शालेय, आंतरशालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग.
लोककला
लोककलांचा अभ्यास आणि परिचय
पोवाडा, भारूड, गोंधळ, लेझीम, कोळी नृत्य अशा विविध लोककलांचा अभ्यास आणि परिचय आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यात्मक कलाकृतीमध्ये सहभाग घेतला आहे.
संस्कारवर्गाचे स्वरूप
- वय ३ ते १८ वर्षे
- श्लोक-स्तोत्र पाठांतर
- भारतीय संस्कृती
- मूल्याधिष्ठित उपक्रम
- पालकांशी संवाद
सन्मान व गौरव
मिळालेले पुरस्कार व सन्मान
- सुषमा स्वराज अवॉर्ड — २०२३लोणावळ्यातील युवा कीर्तनकार व सामाजिक कार्यकर्ती म्हणून.
- ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजी पुरस्कार — २०२४मावळातील एकमेव युवा नारदीय कीर्तनकार म्हणून.
- वसंत व्याख्यानमाला समिती, लोणावळाबालकीर्तनकार म्हणून सन्मानचिन्ह.
- युवा साहित्य मंचआयोजित स्वरचित काव्य स्पर्धेत पारितोषिक.
- खालापूर यूथ फेस्टिव्हलगायन व नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक.
- कोकण मराठी साहित्य परिषद (को.म.सा.प.)रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक.
- कुटुंब प्रबोधन, लोणावळाश्लोक व स्तोत्र पठण स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
- इतर स्पर्धाविविध वक्तृत्व, गायन, काव्य, श्लोक-स्तोत्र, नृत्य, चित्रकला, रांगोळी आणि एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग.
संस्कारवर्ग वा कार्यक्रमाचे नियोजन करताय?
आपल्या संस्थेसाठी किंवा गावासाठी चौकशी पाठवा.